सुदृढ समाज निर्मिती करिता माध्यस्थांची मोलाची भूमिका : न्यायाधीश ए.आर.भडके

203

– देसाईगंज न्यायालयात मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज , २१ नोव्हेंबर : न्यायालयात चालवण्यात येणाऱ्या मध्यस्थी केंद्राचा पक्षकरांनी लाभ घ्यावा, मध्यस्थी केंद्र सुदृढ समाज निर्मितीचे माध्यम ठरत असून सुदृढ समाज निर्मिती करिता माध्यस्थांची मोलाची भूमिका आहे असे प्रतिपादन तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश क.स्तर व न्यायदंडाधिकारी प्र.श्रेणी ए.आर.भडके यांनी केले. ते देसाईगंज येथील न्यायालयाच्या सभागृहात आजादी का अमृत महोत्सव निमित्त मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन १९ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात आले होते यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देसाईगंज न्यायालयाचे न्यायाधीश ए.आर.भडके तर मुख्य भत्ता म्हणून जेष्ठ अधिवक्ता ॲड. संजय गुरु व ॲड. दत्तू भाऊ भिलारे हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता ॲड. संजय गुरु यांनी मध्यस्थ्यांची भूमिका ही फार पुरातन काळापासून असून महाभारतात पहिले मध्यस्थ म्हणून श्रीकृष्ण यांनी मध्यस्थाची भूमिका निभावली होती तसेच पाच मुखी परमेश्वर या संकल्पनेचा आधार घेत शासनाने गावातील भांडण- तंटे सोडवणे तंटामुक्त समितीची स्थापना करून प्रत्येक न्यायालयात मध्यस्थी केंद्राची स्थापना केली आहे असे सांगितले.
ह्या प्रसंगी प्रशिक्षित मध्यस्थ ॲड. दत्तू पिलारे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी ॲड. बांबोळकर, ॲड. कु. जुईली मेश्राम,ॲड. चोपकर, ॲड. शेंडे, ॲड. ईचिलवार व सर्व अधिवक्तागण हजर होते.
कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी म्हणून तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सहाय्यक, बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन ॲड. एल. यु. खोब्रागडे यांनी केले तर आभार ॲड. मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता न्यायालयाचे अधीक्षक अनिल आमटे, चव्हाण, लिपिक महाजन व इतर न्यायालयीन कर्मचारी यांनी पपरिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here