सैन्य भरतीसाठी गेलेले महाराष्ट्रातील 60 ते 70 विद्यार्थी अडकले आसाम मध्ये

306

The गडविश्व
पुणे : भारतीय सैन्यात नोकरी मिळावी यासाठी मिलेट्री भरतीसाठी गेलेले महाराष्ट्रातील 60 ते 70 विद्यार्थी हे आसाममध्ये अडकले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना आसाममध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. या मुलांच्या जेवणाची देखील सोय आसामच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलेली नाही. आसाममध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकारकडे साकडे घातले आहे. आम्हाला आसाममधून तातडीने बाहेर काढा आणि आपल्या राज्यात घेऊन चला, अशी विनंती विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सरकारला केली आहे. लष्कर भरतीसाठी गेलेल्या या विद्यार्थ्यांना आता मदतीचा हात हवा आहे.
आसाममध्ये अडकलेल्या राज्यातील 60 ते 70 विद्यार्थ्यांनी मदतीसाठी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांना कॉल केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला लवकरात लवकर मदत करावी अशी विनंती विद्यार्थ्यांनी रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडे केली. त्यानंतर रुपाली पाटील यांनी आपण लगेच अजित पवार यांच्याशी संपर्क साधत माहिती दिल्याचे सांगितले आहे. आसाममध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर राज्यात आणले जाईल, असे आश्वासन रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here