स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समितीच्या वतीने घेतलेल्या रक्तदान शिबिरात मुलींनी घेतला पुढाकार

525

– एकूण 23 रक्तदात्यांनी केले रक्तदान

The गडविश्व
गडचिरोली : काल सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण २३ रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान केले. विशेष म्हणजे या रक्तदान शिबिरात मुलींनीही पुढाकार घेतला होता.
या भव्य रक्तदान शिबिरामध्ये सौ. मेघा घरजारे, शामराव बहेकर, अमोल गोन्नाडे, मोहित राऊत, लोकेश निखारे, रोहित मुळे, श्याम खोब्रागडे, अजय महाडोर, रूपेश धुडसे, जानी छताळे, योगेश देवीकर, रोहित नागपुरे, प्रशांत सोरते, राकेश रंधये, सौरभ कुकुडकार, राजकुमार चचाणे, आकाश रंधये, अभिषेक जुआरे, भूषण गरमुळे, निखिल निखारे, टिकाराम उपरीकर, स्वप्नील वाकडे, विकास वाकडे, राहुल इन्कणे, सुशिल मेश्राम अशा एकूण 23 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदाता ओमकार नारदेलवार आणि समाजकार्यकर्ती सिंधूताई सपकाळ व गाणं कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. या भव्य रक्तदान शिबिराला शशिकांत वैद्य, प्रशांत दोनाडकर, के.टी. किरणपुरे, गंगाधरजी जुआरे, प्रफुल खापरे, रंजित बनकर, रोशन दुमाणे, आदिल खान, चेतन दडमल, सारंग जनबंधु आणि स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समितीच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.
रक्तदान शिबिराचे आयोजन स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समितीचे जिल्हाध्यक्ष चारुदत्त राऊत, उपजिल्हाध्यक्ष निशिकांत नैताम यांच्या मार्गदर्शनाखाली जान्हवी बडवाईक, अमिषा वाटूलकर, ययती राऊत, वेदांती राऊत, श्रुतिका उईके, आरजू इंकने, आर्या रेवतकर, संगीता रेवतकर, ज्योती खेवले, सरिता तागवान, प्रीती भोयर, रजनी किरणापुरे व वंदना जुआरे यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here