– लखमापुर बोरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
The गडविश्व
गडचिरोली : स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समिती अंतर्गत चामोर्शी तालुक्यातील लखमापुर बोरी येथे आज मंगळवार १ मार्च २०२२ ला घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदानाचे महत्व लक्षात घेऊन एकुण ३४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे आयोजन स्वयं रक्तदाता जिल्हा समितीचे अध्यक्ष चारुदत्त राऊत, उपाध्यक्ष निशिकांत नैताम, सचिव मनोज पीपरे, कोषाध्यक्ष आकाश आंबोरकर, दिलखुलास बोदलकर यांनी केले होते.
यावेळी प्रल्हाद वैरागडे, आशिष बारसागडे, धनराज पिपरे, अरुण सुरजागडे, गोपीचंद बारसागडे, रूपेश सातपुते, कालेश्वर नैताम, देवेंद्र सत्तलवार, महेश मेक्कलवार, अरुण गेडाम, श्रीकृष्ण वैरागडे, अंकुश वैरागडे, तामदेव सातपुते, विजय रॉय, मंगेश वासेकर, दिलखुलास नैताम, नागेंद्र बोदलकर, सुरेश सोनटक्के, सचिन भोयर, रोशन बोदलकर, उमाजी भोयर, डोमदेव मंनेवार, राहुल बारसागडे, सुधाकर मोटघरे, प्रशांत युल्ले, गोकुळ वासेकर, नेताजी कुथे, मयुर पोलजीवार, मंगेश कोसरे, हेमंत मेश्राम, टिकाराम शेंडे, महेश काटवे, डामदेव सातपुते, विनोद भोयर अशा एकुण ३४ रक्तदात्यांनी रक्तदान करून दानाची श्रेष्ठ भूमिका निभावली.
यावेळी स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समितीचे सदस्य, गावातील युवा आणि जिल्हा रक्तपेढीतील कर्मचारी उपस्थित होते.