– न्यायालय उद्या शिक्षा जाहीर करणार
The गडविश्व
वर्धा : जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जळीतकांडाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले होते. या प्रकरणाच्या खटल्यात दोन्ही बाजुंचा युक्तिवाद संपल्यानंतर आज न्यायालयाने या प्रकरणात आरोपी विकेश नगराळे दोषी असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाचा निकाल आता उद्या न्यायालय देणार आहे. अशी माहिती सरकारी वकील उज्वल निकम यांची दिली.
हिंगणघाट जळीतकांड प्रकरण 2 फेब्रुवारी 2020 ला घडले होते. प्राध्यापिका तरुणीला भर रस्त्यात पेट्रोल टाकुन जाळण्यात आले होते. 7 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 10 फेब्रुवारी 2020 रोजी पहाटे तिचा मृत्यू झाला होता.
पीडितेच्या मत्यूनंतर वर्ध्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. यावेळी आरोपींवर तत्काळ कारवाईची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याला अटक करण्यात आले. या प्रकरणाची आज सुनावणी झाली. न्यायालयात आरोपीविरोधात 302 चा गुन्हा सिद्ध झाला. मात्र, आज आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली नाही. उद्या आरोपीला न्यायालयात शिक्षा सुनावण्यात येईल, अशी माहिती सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली.