हिवताप प्रतिरोध महिण्यानिमित्त जिल्हयात विविध उपक्रमाचे आयोजन

243

The गडविश्व
गडचिरोली : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत ” हिवताप प्रतिरोध महिण्या ” जुन महिण्यात साजरा केला जातो. या अनुषंगाने हिवताप व ईतर किटजन्य आजारविषयी जनतेमध्ये जागृती निमार्ण व्हावी यासाठी जनजागरण मोहिमेसह विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या जनजागरण मोहिमेमध्ये गावपातळीवर हिवतापाची लक्षणे,उपचार व हिवताप प्रतिरोधाच्या विविध उपाययोजनांची माहिती विविध माध्यमाद्वारे पोहचविणे आवश्यक आहे. डासोत्पत्ती प्रतिंबध उपयायोजनेमध्ये सहभाग वाढविणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. यामध्ये जलद ताप रुग्ण सव्हेक्षण,डासोत्पत्तीस्थानामध्ये गप्पीमासे सोडणे, ग्रामिण आरोग्य पोषाहार व स्वच्छता समितीची सभा आशा बळकटीकरण, कंन्टेनर सर्व्हेक्षण, चित्रकला स्पर्धा, हस्तपत्रिका वाटप, कोरडा दिवस पाळणे,मच्छरदाणीचा वापर करणे, किटकनाशक फवारणी सपूंर्ण घरात करुन घेणे या विषयी जनतेमध्ये जागृती निमार्ण केली जाईल.
नागरिकांनी आपले घरातील पाणी झाकून ठेवावे, घरासमोरील नाल्या वाहत्या करणे, खिडक्यांना जाळी बसविणे, संडाच्या व्हेटपाईपला जाळी बसविणे, झोपतांना ॲडामाक्सचा वापर करणे, कुलर मधिल पाणी आठ दिवसांनी पाणी स्वच्छ करणे, घरासमोर डबकी साचु देऊ नये, नारळयाच्या करवंटया तसेच घरातील कचऱ्यांची योग्य विल्लेवाट लावावी, आपल्या जवळील परिसर स्वच्छ ठेवावा, घरातील कोणत्याही व्यक्तीस ताप आल्यास तात्काळ जवळच्या शासकीय दवाखान्यात रक्ताची तपासणी करुन घ्यावी.
हिवताप र्निर्मुलनासाठी उपचारा बरोबर प्रतिबंध महत्वाचा आहे. या आजाराचा फैलाव हा ऍन्नाफिलिस डासाच्या मादी पासून होतो हिवतापावर मात करावयाची असेल तर सरकारी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नाबरोबरच जनतेचा सहभाग व इतर सरकारी यंत्रणेचे सहकार्य तितकेच महत्वाचे आहे. सर्वांनी भविष्यात या आजाराचा उद्रेक होवू म्हणून वेळीच प्रतिबंधात्मक उपयोजना राबविण्याचा दूष्टिने नागरिकांनी जागरुक राहावे व या आजाराची लक्षणे आढळून आल्यास वेळीच नजिकच्या आरोग्य उपकेंद्र,प्रा.आरोग्य केंद्र,व ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्याची गरज असते हिवतापाची तपासणी व उपचार सर्व आरोग्य उपकेंद्रामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे.
हिवताप आजारात रुग्णांस थंडी वाजुन ताप येतो व हुळहुळी भरते हा ताप 1 दिवसा आळ किंवा 2 दिवसा आळ येतो अंगदुखणे,डोके दुखणे तसेच रुग्णांस पाघरुण घ्यावेसे वाटते व नंतर घाम येऊन ताप कमी होतो आणि रुग्णास थकवा येतो या साठी हिवतापाचे लवकर निदान व त्वरित उपचार करुन घ्यावेत उपचार न घेतल्यास तसेच अर्धवट उपचार घेतल्यास हा आजार प्राण घातक ठरु शकतो वांरवार ताप येऊण रुग्ण बेशुद होऊ मागील तीन वर्षातील गडचिरोली जिल्हयाची हिवताप आजाराची परिस्थिती पाहिली तर सन 2020 मध्ये 661169रक्त नमुने घेतले त्यात 6485 रुग्णांचे रक्त दुषित आढळुन आले. व मृत्यु 6 तसेच 2021 मध्ये 875134 रक्त नमुने घेतले त्यात 12326 रुग्णाचे रक्त दुषित आढळुन आले असुन मुत्यु 8 तर 2022 मार्च अखेर 452105 रक्त नमुने घेतले त्यात 2137 रुग्ण आढळुन आले असुन 4 हिवतापाने मृत्यु झाले आहे. भविष्यात हिवताप आजाराचे उद्रेक होवु नये म्हणुन आरोग्य खात्यामार्फत सर्व प्रकारचे नियोजन करण्यात आलेले असुन हिवताप आजारावर मात मिळवण्यासाठी गावातील सर्व नागरीकाचे सहकार्य आवश्यक आहे. त्यासाठी खालील साधे व सोपे प्रतिबंधात्मक उपाययोजना जनतेने राबविणे गरजेचे आहे.वरिल दक्षता प्रत्येकाने घेतल्यास डासाची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाही. म्हणजे योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार तुम्हाला होणा-या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वानी हातभार लावला पाहीजे. असे आवाहन आरोग्य सहाय्यक कालीदास राऊत व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here