– व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल
The गडविश्व
गडचिरोली, १५ जुलै : गडचिरोली जिल्ह्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसाने तसेच मेडिगट्टा व गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने
पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या दक्षिणेकडील अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने बचावकार्य सुरू आहे.
अशातच पुरात अडकलेल्यांना हेलिकॉप्टर च्या सहायाने बचाव कार्य करत असल्याचा एक व्हिडिओ गुरुवार १४ जुलै च्या दुपार पासून सोशल मीडियावर फिरत असून हा वायरल व्हिडिओ गडचिरोली जिल्ह्यातील आहे असा दावा करण्यात येत आहे.
या विडिओ बाबत आम्ही सत्यता पडताळून बघितले असता हा व्हिडिओ गडचिरोली जिल्ह्यातील नाही असे कळले. तसेच जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाने तशी कोणतीही महिती सादर केली नाही.
सदर वायरल विडिओ फार जुना असून नोव्हेंबर २०२१ या वेळचा आहे. Indian Air Force ने १९ नोव्हेंबर २०२१ रोजी ट्विट केले असून त्यात सांगितले आहे की ” १९ नोव्हेंबर २०२१ रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील चित्रावती नदीच्या वाढत्या पाण्यात अडकलेल्या दहा लोकांना Mi-17 heptr ने कठीण हवामानात बाहेर काढले.”
#HADROps
#AndhraFloodToday, @IAF_MCC Mi-17 heptr evacuated ten people stuck in the rising waters of Chitravati river in Ananthapur district, Andhra Pradesh, in difficult weather conditions.#HADROps
#AndhraFlood
वायरल होत असलेल्या विडिओमध्ये एका हेलिकॉप्टर च्या सहाय्याने वाहत्या पाण्याच्या प्रवाहात जेसीबीवर काही लोक दिसत आहेत, त्यातील एकाला हेलिकॉप्टर ने वर ओढत आहे. तसेच व्हिडिओ चांगले डोळे लावून बघितल्यास जेसीबीच्या मागच्या एक मोठ्या वाहनासारखे वाहन आहे त्यावर सुद्धा काही नागरिक दिसतात, एक व्यक्ती काठावरून मोबाईल मध्ये सर्व घटना टिपत आहे.
सध्या गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने तसेच मेडिगट्टा व गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिणेच्या भागात पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरची मदत घेऊन काढण्यात येत असल्याचा समजून तो व्हिडिओ गडचिरोली येथील असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकजण व्हाट्सएपच्या स्टेट्सवर सुद्धा व्हिडिओ लावलेला दिसले तर काहींनी स्टेट्सवर बघून व्हिडिओची मागणी करून आपल्या व्हाट्सएपच्या स्टेट्सवर लावले. यावेळी विविध मजकूरही देण्यात आल्याचे बघण्यात आले. ” सॅल्युट, थरारक बचावकार्य, गावाचे नाव, बचावकार्यावर स्तुतीसुमनेही करण्यात आले, मजबूत जेसीबी आशा विविध प्रकारचे मजकूर लिहून विडिओ वायरल होत आहे.
मात्र तो विडिओ गडचिरोली येथील नसून १९ नोव्हेंबर २०२१ रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील चित्रावती नदीच्या वाढत्या पाण्यात अडकलेल्या दहा लोकांना Mi-17 heptr ने कठीण हवामानात बाहेर काढले त्यावेळचा आहे.
#HADROps pic.twitter.com/c2JQlWFiLs
— Indian Air Force (@IAF_MCC) November 19, 2021