१०२ कोटींच्या बनावट खरेदी बिलांचा वापर करुन इनपूट टॅक्स क्रेडिट (ITC) घेण्याऱ्या व्यापाऱ्यास अटक

435

The गडविश्व
मुंबई : महाराष्ट्र वस्तु व सेवाकर विभागाने जवळपास 102 कोटी रुपयांच्या बनावट खरेदी बिलांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) घेऊन शासनाच्या 14 कोटींचा कर महसुल बुडवणाऱ्या व्यक्तीस अटक केली आहे.
मे. समिक्स पुरवठादार व्यापाऱ्यांकडून 8 कोटींचा महसुल मिळविण्यात महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागास यश आले आहे.
मे. समिक्स विरोधात महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून करचोरी विरोधी विशेष अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलांसंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमे अंतर्गत मे. समिक्स या कंपनीचे प्रोप्रायटर यांस 7 एप्रिल 2022 रोजी अटक करण्यात आली. ह्या प्रकरणाबाबतचा तपास सुरु आहे.
महानगर दंडाधिकाऱ्यांनी या व्यापाऱ्यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही धडक कारवाई सहाय्यक राज्यकर आयुक्त अमोल सुर्यवंशी यांनी निळकंठ एस. घोगरे, राज्यकर उपआयुक्त व राहुल व्दिवेदी (भा.प्र.से.) राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
सर्व समावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करून आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तु व सेवाकर विभाग कर चुकवणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here