The गडविश्व
जालना: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे यामुळे पुन्हा एकदा शाळा आणि महाविद्यालयाचे दार खुले होत आहे. तर राज्यातील महाविद्यालय १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग 1 फेब्रुवारी पासून सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
गेल्या दोन वर्षांपासून शाळा-महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला पण पुन्हा एकदा शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. पण ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्यामुळे पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या होत्या पण, आता पालकांकडून शाळा सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे. यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही शाळा सुरू करण्यास होकार दर्शवला आहे.