– सहा दिवसांपासून होता बेपत्ता
The गडविश्व
गडचिरोली / कोरची, ३१ जुलै : सहा दिवसांपूर्वी आत्महत्येची चिट्ठी लिहून बेपत्ता असलेला कोरची येथील मुकेश निनावे अखेर नागपूर जिल्हयातील भिवापूर येथे सुखरूप मिळून आला आहे. यामुळे पत्नी तृप्ती निनावे सह पोलीसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
गडचिरोली जिल्हयातील कोरची येथील व्यापारी मुकेश निनावे हा २२ जुलै रोजी अचानक घरातून निघून गेला होता. दरम्यान देसाईगंज-ब्रम्हपूरी मार्गावर असलेल्या वैनगंगा नदी पुलावर त्याचे कपडे व काही साहित्य तसेच आत्महत्या करीत असल्याची चिट्ठी आढळून आली होती. बेपत्ता असल्याने पोलीस त्याचा शोध घेत होती. यादरम्यान मुकेश हा भिवापूर येथे आपल्या मावशीच्या मुलीच्या घरी असल्याची माहीती पत्नी तृप्ती यांना फोनव्दारे मिळाली. पत्नी तृप्ती यांनी लागलीच याची माहिती पोलीसांनी दिली असता मुकेश ला कोरची येथे आणून पोलीस स्टेशन मध्ये बोलावण्यात आले. व विचारपूर करण्यात आली. यावेळी मुकेशने कौटुंबीक व मानसिक तणावातून आत्महत्या करण्यासाठी चिठ्ठी लिहून बेपत्ता असल्याचे सांगितले. यावेळी पोलीसांनी त्यांला समज देत समुपदेशन केले. मुकेशच्या सुखरूप मिळून आल्याने पत्नी तृप्ती, कुटुंबातील व्यक्ती व पोलीसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
दरम्यान वैंगंगगा नदीपुलावर आत्महत्येची चिठ्ठी मिळून आल्याने पोलीस अधिक गतीने तपास करीत होते हे विशेष.