– शेतकरी कामगार पक्षाने प्रसारित केलेल्या प्रेस नोट बाबत जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा
The गडविश्व
गडचिरोली (Gadchiroli), २१ सप्टेंबर : एट्टापल्ली तालुक्यातील मलमपाडी येथील शेतकरी अजय टोप्पो आत्महत्या प्रकरणाबाबत वरीष्ठ स्तरावरून चौकशी बाबत कोणतेही आदेश नाही असा खुलासा खुद्द जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केला आहे. यामुळे आता या प्रकरणाला पुन्हा एकदा नवे वळण आल्याचे पहावयास मिळत आहे.
अजय टोप्पो यांच्या आत्महत्या प्रकरणी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्री वेळदा यांनी राज्य मानवी हक्क आयोग आणि राज्याचे मुख्य सचिवांकडे तक्रार करुन जिल्हाधिकारी संजय मिणा आणि अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ८ सप्टेंबर रोजी केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत राज्याच्या मुख्य सचिवांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असल्याचे शेतकरी पक्षाचे म्हणणे आहे. याबाबत प्रेस नोट काही माध्यमांना देण्यात आली. मात्र जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी खुद्द चौकशी प्रकारणा बाबत खुलासा केला आहे.
जिल्हाधिकारी यांनी खुलासा मध्ये म्हटले आहे की,
“गडचिरोली जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाविरूद्ध शेतकरी कामगार पक्ष, गडचिरोली यांनी वरिष्ठ स्तरावरील चौकशी बाबत प्रेस नोट काही माध्यमांना दिली आहे. यामधे फक्त शेकापची बोगस तक्रार विविध माध्यमांना फॉरवर्ड केलेली आहे. वरीष्ठ स्तरावरून याबाबत कोणतेही आदेश दिलेले नाहीत. सदर प्रेस नोट चुकीची असून दुर्भावनापूर्ण हेतू असलेली आहे. यावर कोणीही विश्वास ठेवू नये. याबाबत प्रशासनाची जाणून बूजून बदणामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामधे कोणतेही तथ्य नसून निव्वळ अफवा आहे. कोणत्याही राज्य शासनाच्या विभागाने याबाबत तसे पत्र दिले नाही. सदर माहिती चुकिची असल्याने कोणीही ती प्रसिद्ध करू नये.”