– धम्मराव तानादु यांचे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त गुणवंत विध्यार्थी व जेष्ठ समाज सेवकाचा सत्कार सोहळा प्रसंगी प्रतिपादन
The गडविश्व
सावली, २ ऑगस्ट : अखिल भारतीय मादगी समाज संघटना महाराष्ट्र राज्य शाखा सावलीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने शाखा सावली ने पुढाकार घेऊन मादगी समाजातील दहावी बारावी प्राविण्य प्राप्त करणाऱ्या गुणवंताचा गुण गौरव व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र ,शील्ड आणि पुष्पगुच्छ देऊन भविष्यातील वाटचाल दिशा आणि एम पी एस सी. Upsc सारख्या उच्च स्तरावर विद्यार्थी जावे आणि समाजाचा नाव लौकिक करावा याकरिता प्रोत्साहन देण्याकरिता तसेच मादगी समाजातील सर्व भविष्यातील येणारी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी करिता गुणवंताचा सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच जेष्ठ समाजसेवा करणाऱ्या अनेक व्यक्तीचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी हलाखीची परिस्थिती असतांना व अत्यंत भेदभावामुळे केवळ दिड दिवसाचे शिक्षण घेऊन साहीत्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जागतिक किर्तिचे मानधनी ठरले,त्यांचा आदर्श घेउन विद्यार्थ्यांनी स्वत:ची प्रगती करावी. तळमळ असेल तर कुठल्याही परिस्थितीत समाजसेवा करता येते हे अण्णा भाऊंनी दाखवून दिले हाच आदर्श घेउन प्रत्येक समाजाने प्रगती करावी असा संदेश धम्मराव तानादु यांनी अध्यक्ष स्थानावरून प्रतिपादन केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने अनेक प्रमुख मार्गदर्शक यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक कौटुंबिक जीवन चरित्रावर भर देऊन उपस्थिताना मार्गदर्शन केले.
लोकशाहीर आन्नाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष धम्मराव तानादु, उद्घाटक लताताई लाकडे, सहउद्घाटक तालुका कृषी अधिकारी गोडसे, प्रमुख अतिथी सावली पोलिस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर, गोपाल रायपुरे, लक्ष्मण मोहुर्ले, प्रवीण गेडाम, हिरालाल भडके, अविनाश पाल, संघटनेचे प्रदेश महासचिव आकाश आलेवार, संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर पगळपल्लिवार, अखिल भारतीय मादगी समाज संघटना चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अनिल बोटकावार, गडचिरोली जिल्हा प्रभारी विजय देवतळे, सचिव किशोर नरुले, सतीश दुर्गमवार, चंद्रपूर शहर अध्यक्ष विजय गंगासागर, जिल्हा प्रकल्प अधिकारी गनविर, गट शिक्षणाधिकारी खंदारे, रामदास कलमुकवार, आशा शिंदे कृषी सहाय्यक, शामराव जिलेपेलीवार, बिटूताई आलेवार, रोहित आलेवार, विनोद गोरडवार, सुनील कोरेवार, रमेश लाटेलवार, सोमेश मोहुर्ले, केशव लाटीलवार, कालिदास लाटलवार, रूपचंद लाटेलवार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन आयु.संघरत्न निमगडे तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अनिल बोटकावार, आभार आयु.गजू आलेवार यांनी मानले.