अतिदुर्गम पेठा येथे व्यसन उपचार शिबिर : १५ रुग्णांनी घेतला उपचार

321

– सर्च संस्थेच्या उपसंचालकांनी दिली भेट
The गडविश्व
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या पेठा येथे गाव संघटनेच्या मागणीनुसार व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील १५ रुग्णांनी उपचार घेत दारूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान सर्च संस्थेचे उपसंचालक तुषार खोरगडे यांनी शिबिराला भेट देऊन मार्गदर्शन केले.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दारू सोडण्याची इच्छा असणाऱ्या रुग्णांना उपचाराची सोय उपलब्ध व्हावी, या उद्देशाने मुक्तिपथ अभियानातर्फे गाव पातळीवर क्लिनिक घेण्यात येते. आतापर्यंत अनेक रुग्णांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. नुकतेच पेठा येथेही गाव संघटनेच्या मागणीनुसार क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १५ रुग्णांनी नोंदणी करून पूर्ण उपचार घेतला. दरम्यान सर्च संस्थेचे उपसंचालक तुषार खोरगडे यांनी शिबिराला भेट देऊन मार्गदर्शन केले व जास्तीत जास्त रुग्णांनी उपचार घेण्याचे आवाहन केले.
रुग्णांना दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात आदींची माहिती देत साईनाथ मोहुर्ले यांनी रुग्णांना समुपदेशन केले. संयोजिका पूजा येलूरकर यांनी रुग्णांची केस हिष्ट्री घेत धोक्याचे घटक, नियमित औषोधोपचार घेणे आदींची माहिती दिली. क्लिनिकचे नियोजन मुक्तिपथचे तालुका संघटक किशोर मलेवार व उपसंघटक रुपेश हिवरकर यांनी केले. यशस्वीतेकरिता मुक्तीपथ गाव संघटन सदस्य दसा कोरामी, पोलीस पाटील निर्मला तोडेवार, शितल वेलादी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here