– कुदरी व केहकापरी येथे शिबीर
The गडविश्व
गडचिरोली : व्यसनाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन अतिदुर्गम गावातील २७ रुग्णांनी उपचार घेत दारूमुक्तीचा निर्धार केला आहे. मुक्तिपथ अभियानाद्वारे एटापल्ली तालुक्यातील कुदरी व भामरागड तालुक्यातील केहकापरी येथे शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम गाव कुदरी येथे गावकऱ्यांच्या मागणीनुसार गावपातळी व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १६ रुग्णांनी उपचार घेतला. या शिबिराचे नियोजन व व्यवस्थापन तालुका संघटक किशोर मलेवार, तालुका प्रेरक रवींद्र वैरागडे यांनी केले. यावेळी गाव पाटील नानसु तिमा, उपसरपंच देवू पुंगाटी, ग्रामसभा सचिव मंगेश पुंगाटी, रावजी कवडो, मादी गावडे , मुख्याध्यापक बी. पी. तोरे उपस्थित होते. भामरागड तालुक्यातील केहकापरी येथील शिबीरात ११ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. शिबीराचे नियोजन तालुका प्रतिनिधी आबिद शेख यांनी केले. यशस्वीतेसाठी गाव संघटनेकडून हरीश कुंजामी, गिल्ला उसेंडी यांनी सहकार्य केले. अशा एकूण २७ रुग्णांवर उपचार करण्यात आले.
दोन्ही शिबिरात साईनाथ मोहुर्ले यांनी रुग्णांचे समुपदेशन केले. रुग्णांना दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात आदींची माहिती दिली. संयोजिका पूजा येलूरकर यांनी रुग्णांची केस हिष्ट्री घेत धोक्याचे घटक, नियमित औषोधोपचार घेणे आदींची माहिती दिली. तसेच रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले.