एका संध्याकाळी उशिराच मी ऑफिस ची सगळी काम आटोपून मंदिराबाहेरील एका आळ बाजूच्या बाकळ्यावर बसली. अंधार पडत चालला होता, वर्दळ ही फारशी नव्हती. घरी जायच्या आधी कुणाचे काही कॉल्स आले का बघावं म्हणून मोबाईल काढला बघते तर तो ही हँग झालेला, तेवढ्यात पाऊस ही सुरू झाला. पण माझा हँग झालेला मोबाईल चालू करण्याचा खटाटोप चालूच होता , पावसाच्या सरी आणखी वाढायला लागल्या. आज एक ही बस, टॅक्सी वैगरे बराच वेळ झाला तरी दिसत नव्हते म्हणून चौकशी केली तर कळल काही कारणास्तव आज चालकांचा संप आहे . रात्री चे आठ वाजत आले होते, थोडयाच वेळात मी तिथून हाय-वे वर आली लिफ्ट मागायचे भरपूर प्रयत्न केले पण एकतर पाऊस आणि चालकांचा संप त्यामुळे कुणीच लिफ्ट देईना.
तेवढ्यात कुणी तरी खांद्यावर हात ठेवला, मी दचकुन मागे बघितलं तर आमच्याच ऑफिस मध्ये साफसफाई ची काम करणारी सुनीता होती. तिने आपुलकीने विचारलं,” मॅडम काय झालं ?एवढ्या रात्री तुम्ही इथे कशा”!
मी तिला घडलेली सगळी हकीकत सांगितली. तिने त्वरीत आपला मोबाईल दिला आणि म्हणाली ” घ्या मॅडम घरी फोन करा”. आजपर्यंत माझ्या वर मोबाईल नंबर पाठ करायची वेळ च आली नव्हती. त्यामुळे नीरज ला सोडलं तर दुसऱ्या कुणाचाच नंबर पाठ नव्हता. मी लगेच नीरज ला कॉल केला पण त्याचाही नंबर नॉट रीचेंबल येत होता. सुनीता ने लगेच विचारलं ” मॅडम तुम्हाला काही हरकत नसेल तर मी तुम्हाला माझ्या सायकल ने घरी सोडून देते”. मी म्हटलं अग एवढा त्रास कशाला मी करेन एगजेस्ट ती म्हणाली,” मॅडम खूप वेळ झाला आहे त्यात ही चालकांचा संप आहे. आज तुम्हाला घरी जायला काहीच मिळणार नाही. प्लीज ऐका चला मी सोडून देते.” पाच किलोमीटर सायकल चालवून तिने मला घरी सोडलं. घरी पोहोचल्यावर मी तिला म्हटलं अग रात्र खूप झाली आहे थांबून जा इथेच. तर ती म्हणाली “नाही मॅडम घरी सासूबाई एकट्या आहेत मी त्यांची औषध घ्यायसाठीच बाहेर पडली होती मला घरी जावंच लागेल” आणि तशीच ती निघाली. माझ्या डोळ्यात पाणी च आलं,मन खूप अस्वस्थ झाल.
कारण, याच सुनीता ने सकाळी मला सासूबाई ची तब्येत बरी नाही म्हणून सुट्टी मागितली तर मी तुमची कामे न करण्याची ही सगळी नाटक असतात असं बोलून तिला नकार दिला होता. कधी कधी आपल्याला मोठेपणाचा एवढा अहंकार चढलेला असतो की, आपण एखाद्याला माणूस म्हणून ही बघत नाही. की कधी त्यांची अडचण जाणून घेऊन साधी चौकशी ही करत नाही.आज मलाच माझी लाज वाटत होती.म्हणूनच आल्या दिवसाला, आल्या संधीला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्यातल्या पूर्ण चांगुलपणा ने समोर जायला हवे.
परिस्थिती नुसार कधी आपुलकीचे दोन शब्द बोलायला हवे तर कधी साध्या स्मित हास्याने समोरच्याला आपलेसे करायला हवे न जाणो कोण कधी कुठल्या संकटाला कामी पडेल सांगता येऊ शकत नाही ,कुणाला कधीच कमी लेखू नये.
आपण आपले मिळाले ले अधीकार गाजवतो
पण सहज मिळालेल्या माणुसकीच काय?
– स्वाधिनता बाळेकरमकर