The गडविश्व
देसाईगंज : स्थानिक अनिकेत समाजकार्य महाविद्यात आज ८ मार्च रोजी महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून प्राध्यापिका भुरुभुरे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयातील प्रा. डॉ.गजभिये, प्रा. भागडकर, प्रा. बनपुरकर, प्रा. वालदे तसेच ग्रंथालयातील कर्मचारी डॉ. झलके, हरिनखेडे, वैद्य, बागडे उपस्थित होते.
महिला दिनाचे औचित्य साधुन प्रा. वालदे, प्रा. भुरभुरे, प्रा. डॉ.गजभिये यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.अश्विनी कोहचाडे , प्रास्ताविक अश्विनी सयाम तर कार्यक्रमाचे आभार नेहा कस्तुरे हिने मानले. यावेळी महाविद्यलयीन शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.