अनुसूचित जमातीच्या नोंदणीकृत महिला बचत गटांना शेळी गटाचा पुरवठा करण्याकरीता अर्ज आमंत्रित

489

The गडविश्व
चंद्रपूर : केंद्र पुरस्कृत योजना विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत अनुसूचित जमातीच्या महिला बचत गटांना शेतीस पूरक व्यवसाय व उत्पन्नाचा शाश्वत मार्गाद्वारे जीवनमानाचा दर्जा उंचाविण्याकरीता महिला बचत गटांना शेळी गटाचा पुरवठा करणे योजना राबविण्यात येत आहे. प्रकल्प कार्यालयातंर्गत येणाऱ्या अनुसूचित जमातीच्या नोंदणीकृत महिला बचत गटांना शेळीगटाचा पुरवठा करण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहे.

नोंदणीकृत महिला बचत गटाकरीता पात्रतेचे निकष :

महिला बचत गट नोंदणी दाखला अनुसूचित जमातीचा असावा. गटातील किमान एका सदस्याकडे 7/12 दाखला असणे आवश्यक असून शेळ्यांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करणे आवश्यक राहील. गटातील सदस्यांना अथवा त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना यापूर्वी सदर योजनेचा लाभ आदिवासी विकास तथा अन्य विभागामार्फत घेतला नसल्याबाबतचे संबंधित ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. बचत गटातील सदस्यांनी रहिवासी दाखला, आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र व बचत गटाचे बँकेचे पासबुक अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातंर्गत चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, जिवती, कोरपना, पोंभूर्णा, गोंडपिंपरी, मूल, सिंदेवाही व सावली या तालुक्यातील रहिवासी असलेल्या अनुसूचित जमातीच्या नोंदणीकृत महिला बचतगटांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर येथील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here