The गडविश्व
गडचिरोली : महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास विभागाकडुन राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणेसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते.सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न कमला मर्यादा रु.6.00 लाख आहे.योजनेचा इतर सर्वसाधारण अटी व माहिती साठी प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड येथे संपर्क साधावा.इच्छुक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा,.असे सहा.प्रकल्प अधिकारी (प्रशासन)एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड यांनी कळविले आहे.