-तहसीलदार ओंकार ओतारी यांचे निर्देश
The गडविश्व
गडचिरोली : तंबाखू बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी तालुका समितीमध्ये अन्न व औषध प्रशासनाला सहभागी करावे व त्यांच्या सहकार्याने अवैध तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करावी, असे निर्देश मुक्तिपथ तालुका समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिले.
अहेरी तहसील कार्यालयातील सभागृहात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण व तंबाखू, दारूमुक्त जिल्हा विकास कार्यक्रम अंतर्गत तालुका समितीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. बैठकीत नायब तहसीलदार डी.बी. खोत, फारुख शेख, पोलिस निरीक्षक शाम गव्हाणे, तालुका संघटक केशव चव्हाण, उपजिल्हा रुग्णालयाचे गोपाल कोडापे, प्रतिष्ठित नागरिक टी.जी.भुरसे, ए.बी.मडावी, नपंचे प्रमोद पिलारे, पंस चे कवीश्वर, विस्तार अधिकारी सिकदार उपस्थित होते.
दरम्यान, ग्रापं समित्या किती स्थापन झाल्या, अडचणी काय आहेत याबाबत चर्चा करून पुढील नियोजन करण्यात आले. पोलिस विभागाद्वारे शहरातील मोठे दारू व तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करून विक्री बंद करण्यासंदर्भात मागील दोन महिन्यात झालेल्या कृतीची चर्चा. मागील दोन महिन्यात किती पानठेले व किराणा दुकानदारांना सुगंधित तंबाखू विक्री बंदीसाठी सूचना देऊन तपासणी करण्यात आली. जंगल परिसरातील अवैध मोहफुलाचा सडवा नष्ट करून कारवाई करण्याबाबत वनविभागासोबत चर्चा करून कृती ठरविणे. व्यसनउपचार क्लिनिकची माहिती देणे. दारूविक्री सुरु असलेल्या गावातील पोलिस पाटील व सरपंच, ग्रामसेवक यांना तहसीलदारांची पत्र पाठविणे, अहेरी नगरपरिषद अध्यक्ष यांनी दिलेल्या निवेदनाबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अहेरी, नागेपली व आलापल्ली शहरातील दारू तस्करांवर पथकाच्या माध्यमातून कारवाई करणे, आदी मुद्द्यांवर चर्चा करून नियोजन करण्यात आले.