– विडिओ सोशल मिडीयावर वायरल
The गडविश्व
गडचिरोली (Gadchiroli ) २० सप्टेंबर : जिल्ह्यातून लोहखनिज वाहतुक करणाऱ्या ट्रकमुळे अनेकदा अपघात घडले आहे, रस्त्याची पुर्णत : चाळण झाली असून धुळीने नागरिक त्रस्त आहे. दिवसा वाहतुक बंद व रात्रोच्या सुमारास लोहखनिजाची वाहतुक करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली असता त्याला न जुमानता लोहखनिजाची वाहतुक ट्रक व्दारे करण्यात येत आहे. मात्र सदर ट्रकचा रस्ताच एका आजीबाईने अडवून ट्रकचालकाला चांगलाच धडा शिकवित संताप व्यक्त केला आहे. याबाबतचा विडीओ सोशल मिडीयावर पहावयास मिळत आहे.
गडचिरोली जिल्हयातील एटापल्ली तालुक्यात सुरजागड पहाडीवर लोहखनिज उत्खननाचे (Sujraagadh) काम सुरू असून दररोज मोठया प्रमाणात अवजड वाहनाने वाहतुक केली जाते. असे असतांना या लोखखनिज वाहतुक करणाऱ्या ट्रकमुळे अनेकदा अपघात घडले आहेत तसेच रस्त्याची पुर्णत : चाळण झाली असून धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून लोहखनिज वाहतुक दिवसा न करता रात्रोच्या सुमारास करण्यात यावी याकरिता आंदोलन करण्यात आले होते.
#आजीबाईचा_संताप
सुरजागडमधून लोहखनिजाच्या अवजड वाहतूकीमुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. कित्येक निवेदने, आंदोलन करून उपयोग नाही. दररोज लहान मोठे अपघात, तासनतास ट्रॅफिक जॅम धुळीमुळे डोळ्याचे व श्वसनाचे विकार. रस्ते पूर्णपणे खराब झालेत.1/3
टिप – सर्वांनी RT करावी. pic.twitter.com/mXTZgXcN2O
— Raju kadarlawar (@KadarlawarRaju) September 20, 2022
या प्रकल्पाला सुरूवातीपासूनच स्थानिकांचा विरोध असतांना सुध्दा बळजबरीने प्रकल्प सुरू करून दररोज हजारो टन लोखखनिजाची वाहतुक केली जात आहे. अशातच भर रस्त्यात एका आजीबाईने लोहखनिज वाहतुक करणाऱ्या एका ट्रक चा रस्ता अडवला व चांगलाच धडा शिकविला. याबाबतचा व्हिडीओ सोशन मिडीयावर पहावयास मिळत आहे. व्हिडीओमध्ये रस्त्यावर लोहखनिज वाहतुक करणाऱ्या ट्रकांची लाईन दिसत आहे. तसेच आजीबाई एका ट्रक समोर उभी होवून त्या ट्रक चालकाला ट्रक वापस मागे घे असे म्हणत आहे. रोड तुमच्या मालकीचे आहे काय असे प्रश्न सुद्धा करीत आहे. एकटी महिला आजीबाई सुरजागडच्या लोहखनिज वाहतुक करणाऱ्या ट्रक चालकाशी भिडल्याने कौतुकही होत आहे.