अबब… किराणा दुकानात आढळल्या बँकेपेक्षा अधिक नोटा

1195

– पोलिसांनी छापा टाकून तब्बल १ कोटी ९ लाख रुपये केले जप्त
The गडविश्व
औरंगाबाद : येथील एका तांदूळ व्यापाऱ्याकडे पोलिसांनी छापा टाकून १ कोटी ९ लाख रुपये जप्त केलेत. हा सगळा व्यवहार हवालाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्या दृष्टीने आता जीएसटी आणि आयकर विभाग तपासणी करणार आहे. याच दुकानातून शहरातील हवाला व्यवहार होत असल्याचा पोलिसांना संशय आहे. औरंगाबादेत पोलीस काही दिवस या दुकानावर लक्ष ठेवून होते. या दुकानात मशीनने नोटा मोजणे सुरू असल्याचे कळल्यावर पोलिसांनी छापा टाकला, यावेळी किराणा दुकानात बँकेपेक्षा अधिक नोटा आढळून आल्याचे चित्र पाहून पोलीसही चक्रावले.
औरंगाबादमधल्या चेलीपुरा भागात सुरेश राईस नावाचे दुकान आहे. या दुकानातून हवाला रॅकेट चालवले जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. यानंतर पोलिसांनी या दुकानावर लक्ष ठेवले. अनेक लोक दुकानात जात होती, पण कोणतेही सामान न घेता रिकाम्या हाताने बाहेर येत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांना संशय आल्याने दुकानावर छापा टाकण्यात आला. यावेळी दुकानाच्या ड्रॉव्हरमध्ये २०० आणि ५०० रुपयांच्या नोटांची बंडले आढळून आली. पोलिसांनी दुकानाच्या मालकाकडे याबाबत विचारणा केली. पण त्याला याचे उत्तर देता आलं नाही. हे पैसे हवालाचे असल्याचे= स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी आयकर आणि जीएसची विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. आयकर आणि जीएसटी विभागातर्फे या प्रकरणाचा तपास केला जाणार असून हे पैसे कुठून आले, कोणाल दिले जात होते, याची चौकशी केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here