– डॉक्टरांच्या यशस्वी कामगिरीची जागतिक स्तरावर नोंद
The गडविश्व
धुळे, २९ जुलै : जिल्ह्यातील पोटाळी गावातील एका शेतकऱ्याच्या पोटातून तब्बल एक किलो वजनाचा मूतखडा काढण्यात डॉक्टरला यश आले आहे. डॉक्टरच्या या यशस्वी कामगिरीमुळे रुग्णाला नवजीवन मिळाले आहे. डॉक्टर आशिष पाटील असे डॉक्टचे नाव असून त्यांच्या या कामगिरीची नोंद इंडिया बुक आणि एशिया बुक ऑफ रेकोर्डने घेतली आहे.
धुळे शहरातील साक्रीरोडवर डॉ. आशिष पाटील यांचे यांचे तेजनक्ष रुग्णालय आहे. डॉ.पाटील यांनी पत्रकार परिषद घेत या अवघड शास्त्रक्रियेची माहिती दिली. रमन चौरे (५०) रा. पाटोळी जि.नंदुरबार असे रुग्णाचे नाव असून त्यांना वारंवार लघविचा त्रास होत होता. अनेक रुग्णालयात उपचार केला मात्र त्यांना कोणताही फरक पडला नाही. त्यानंतर त्यांनी धुळे येथील डॉ.आशिष पाटील यांच्या युरोलॉजी सेंटरमध्ये उपचार घेण्यास सुरुवात केली व विविध तपासण्या केल्या असत्या मूत्रपिंडात मोठा गोळा असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान डॉ.पाटील यांनी रमन चौरे यांच्यावर खुली शस्त्रक्रिया केली अस्ट्स पोटातून तब्बल एक किलो वजनाचा मुतखडा निघाला. त्यांच्या या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल डॉ.पाटील यांच्याकडे आता तीन इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, दोन गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, दोन लिमका बुक ऑफ रेकॉर्ड, दोन एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, रिप्लेज बिलीव्ह ऑर नॉट यासह २१ आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत. तसेच मुत्र रोग चिकित्सेतील विविध संशोधनांचे पाच पेटंट मिळवणारे डॉ.पाटील हे भारतातील एकमेव डॉक्टर ठरले आहेत.
गेल्या २० ते ३० वर्षांपासून हा मुतखडा त्याच्या युरीनरी मूत्राशयामध्ये होता. मुतखडा जेवढा छोटा असेल तेवढा त्रास जास्त होतो. तो किडनीमध्ये आला तर आणखी त्रास होतो. मात्र एकदा का मुतखडा मोठा झाला तर त्याचा त्रास कमी होतो. मॅग्नेशियम आणि पोटेशमची कमतरता असेल तर हा मुतखडा मूत्राशयामध्ये जमा होत असल्याचे डॉक्टर पाटील म्हणाले.