– बसथांब्याचे वाजले बारा, बसथांब्याचे साहित्यच गायब
The गडविश्व
ता. प्र / आरमोरी, १६ नोव्हेंबर : बस थांबा हे प्रवाशांना प्रवास करताना आश्रयस्थान असते. मात्र आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथील बस थांब्यावर झुडपी झाडांनी कब्जा केल्याचे दिसून येत ठाणेगाव येथील प्रवाशांना भर उन्हातच बसची वाट पाहत राहावे लागते. याकडे मात्र संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
ठाणेगाव बसथांब्यावर नव्यानेच काही वर्षांपूर्वी बस थांबा तयार करण्यात आला होता. मात्र सदर बस थांब्याचे बारा वाजल्याचे दिसुन येत असून बसथांच्यावरचे लोखंडी साहित्य तसेच छप्पर चोरट्यांनी लंपास केल्याने ठाणेगाव येथील प्रवाशांना भर उन्हातच बसची वाट पाहत राहावे लागत असल्याने अनेक प्रवासांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे ठाणेगाव येथ पुन्हा नव्याने बस थांबा उभारण्यात यावा अशी मागणी ठाणेगाव येथील गावकऱ्यांनी केली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात चोरटे साहित्य लंपास करीत आहेत. मात्र त्यांचा बंदोबस्त केला जात नसल्याने त्यांचे मनसुबे वाढल्याचे दिसुन येत आहे. याकडे पोलिसांनी विशेष लक्ष देऊन भंगार साहित्य खरेदी करणाऱ्यांकडे जाऊन चौकशी करावी अशी सुद्धा मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात भुरट्या चोरांचे प्रमाण वाढले असून हे चोर आपले शोक भागवण्याकरिता मौल्यवान लोखंडी वस्तू हे आरमोरी येथे भंगारच्या दुकानांमध्ये नेऊन विकत असल्याचे गावकऱ्यांचा म्हणणे आहे. सदर प्रकरणाकडे संबंधित विभाग काय कार्यवाही करते याकडे लक्ष लागले आहे.