अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या ३४ गोवंशांची सुटका

739

– वाहनासह १८ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

The गडविश्व
ता. प्र / सावली : अवैधरित्या गोवंशांना ट्रकमध्ये अमानुषपणे कोंबून वाहतूक करीत असल्याच्या माहिती वरून सापळा रचून ३४ गोवंशांची सुटका करण्यात आल्याची कारवाई ११ जून रोजी पहाटेच्या सुमारास सावली पोलिसांनी केली. कारवाईत वाहनासह १८ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, अवैधरित्या गोवंशांची वाहतूक असल्याबाबत माहिती मिळाली असता ११ जून रोजी पहाटेच्या सुमारास खेडी फाटा येथे नाकाबंदी केली असता पहाटे ३.३० ते ४.०० वाजताच्या सुमारास एमएच ३४ बीजी ०९८९० आयशर ट्रॅकला थांबवून झडती घेतली दरम्यान ट्रकमध्ये ३४ गोवंश अवैधरित्या अमानुषपणे कोंबून असलेले आढळून आले. याप्रकरणी पो.स्टे सावली येथे दोन आरोपींवर महा.पशू संरक्षण अधि, प्राणी छळ प्रति.अधि, महा.पोलीस अधि, मोटर वाहन कायदाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईत गोवंशाच्या वाहतुकीकरिता वापरण्यात आलेले वाहन व जनावरे असा एकूण १८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्ह्यातील मिळून आलेल्या एका आरोपीस अटक करून त्यास न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने एमसीआर वर मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले.
सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारीव मल्लिका अर्जुन इंगळे, ठाणेदार आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दर्शन लाटकर, मोहन दासरवार, धीरज पिदुरकर, चालक मरस्कोल्हे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here