अवैध दारूविक्रीवर बसणार आळा

268

– दुर्गापूर येथे ग्रामपंचायत समिती गठीत
The गडविश्व
गडचिरोली : अवैध दारू व तंबाखु विक्रीमुळे लोकांचे होणारे नुकसान बघता, यावर आळा घालण्यासाठी धानोरा तालुक्यातील दुर्गापूर ग्रामपंचायत अंतर्गत अधिकृत ग्रामपंचायत समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून कायद्याची अंमलबजावणी करीत अवैध दारूविक्रीवर आळा घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
दुर्गापूर ग्रामपंचायतमध्ये सभेचे आयोजन करून अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी चर्चा करण्यात आली. यावेळी सरपंच मनीषा टेकाम, उपसरपंच ललिता बेसरा, ग्रामसेवक डोहे, सदस्य विकास कोरचा, यशोदा टेकाम, परमेश्वर गावडे, तालुका संघटक अक्षय पेद्दीवार, उमेदच्या आरती बघेल, कौशल्या बेसरा, मिनका वड्डे, सावित्री बघेल, पुलबाई बफचोरीया, मंगला कड्यामी, उषा रामटेके, शारदा मेश्राम, देवाजी टेकाम, टिहलू वड्डे आदी उपस्थित होते.
सभेमध्ये ग्रामपंचायत समितीद्वारा मुक्तिपथ गाव संघटनेला मान्यता देण्यात आली. गाव संघटनेचे सदस्य कोण आहेत, महत्व इत्यादी सांगण्यात आले. ग्रामपंचायत अधिनियमनुसार दारू व तंबाखू विक्रीबंदी करीता कोणते कायदे आहेत, ग्रामपंचायतला कोणते अधिकार आहेत, आवश्यक ठिकाणी दंडात्मक कारवाई करणे, गाव संघटनेला गावातील अवैध दारू व तंबाखू विक्री बंद करण्यासाठी गरजेनुसार सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले. तसेच गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी समितीच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here