अवैधपणे दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीस ३ वर्ष सश्रम कारावास

550

– गडचिरोली प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी सि.पी.रघुवंशी यांचा न्यायनिर्वाळा

The गडविश्व
गडचिरोली १ जुलै : जिल्ह्यात दारूबंदी असतांना अवैधपणे दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस गडचिरोली येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी सि.पी.रघुवंशी यांनी ३ वर्ष सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवार ३० जून २०२२ रोजी ठोठावली आहे. प्रविण प्रकाश बारड (२६) रा. गोसावी मोहल्ला नवेगाव असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतांना आरोपी प्रविण बारड हा ७ मे २०२० रोजी वाकडी ते मुडझा रोडवर आपल्या खांद्यावर एका चुंगडीमध्ये १५ लिटर हातभट्टी मोहफुलाची दारू किंमत ३ हजार रुपयाचा माल अवैधरित्या विक्री करण्यास नेत असतांना मिळून आला. याप्रकरणी आरोपी विरोधात सफौ दादाजी ओल्लारवार यांनी गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास भुणेश्वर गुरनुले यांनी पोलीस निरीक्षक गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. गुरूवार ३० जून रोजी गडचिरोली न्यायालयातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी सि.पी.रघुवंशी यांनी आरोपी प्रविण प्रकाश बारड यास दोषी धरून कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये ३ वर्ष सश्रम कारावास व २६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी अभियोक्ता राजकुमार उंदिरवाडे तसेच कोर्ट पैरवी म्हणून पोहवा यशवंत मलगाम व कोर्ट मोहर पोशी हेमराज बोधनकर यांनी कामकाज पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here