The गडविश्व
ता.प्र /आरमोरी (नरेश ढोरे) : तलाठी साजा शेगाव अंतर्गत येत असलेल्या पालोरा येथील गाढवी नदीतील रेती सुमारे दहा ते बारा बैलगाड्याने अवैध रीत्या चोरमार्गाने वाहतुक केली जाते याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने पांदन रस्त्यांची पूर्णतः चाळण झालेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
१८ ऑक्टोबर २२ ला सकाळी ८.०० वा.काही शेतकऱ्यांनी तीन बैलगाड्या पकडुन शेगाव येथील तलाठी यांना मोबाईल संपर्क करून लगेच कळवुन त्यांच्या सुपुर्द करण्यात आले व यांना सोडु नका असे सांगितले. परंतु अर्ध्या रस्त्यात तलाठी सोबत काय झाले हे कळलेच नाही दरम्यान त्यांना सोडुन दिले.
दुसऱ्या दिवशी याबाबत तलाठी यांना विचारले असता. बैलगाड्या इकडे तिकडे पसार झाले याला आम्ही काय करणार आम्ही त्या बैलगाडी वर बसून जायला हवे होते का ? तुम्ही पकडले होते तर तुम्हीच कारवाई का केली नाही आम्हाला कशाला सांगीतले असे उत्तर मिळाले. शेतकरी कारवाई करु शकतात तर तलाठी यांचा काय काम ? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.