The गडविश्व
अहमदाबाद : अहमदाबाद येथे २६ जुलै २००८ साली २१ बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज १३ वर्षांनी निकाल लागला आहे. न्यायालयाने तब्बल ३८ दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. अहमदाबादमधील न्यायालयाने ४९ आरोपींना दोषी ठरवले होते. त्यातल्या ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी नऊ हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. ज्यामध्ये सहा हजार कागदोपत्री पुरावे सादर करण्यात आले होते. या प्रकरणी सुनावणीत आतापर्यंत नऊ न्यायाधीश बदलले आहेत. त्याचबरोबर 1117 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. अहमदाबादमध्ये 2008 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी गुजरातमधील विशेष न्यायालयाने निकाल देताना 77 पैकी 49 जणांना दोषी ठरवले आहे. तर 28 जणांना निर्दोष घोषित केले आहे.
Home Breaking News अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने तब्बल ३८ दोषींना सुनावली फाशीची शिक्षा