The गडविश्व
अहेरी : स्थानिक नगरपंचायत मध्ये आज १७ प्रभागाच्या मत मोजणी कार्यक्रम पार पाडले. यात आविसच्या पाच सदस्यांचा विजय झाला आहे.
आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार दिपकदादा आत्राम, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शनात निवडणुक लढवण्यात आले. सदर निवडणुकीत आदिवासी विद्यार्थी संघाचे पाच सदस्य नगरसेवक म्हणून निवडून आले आहे. यात विलास गलबले, महेश बाकेवार, सुरेखा गोडसेलवार, मीना ओंडरे, रोजा करपेत आदि निवडून आले आहे.
विशेष म्हणजे अहेरी राजनगरी असुन सत्ताधारी पक्षाचे विद्यमान आमदार यांच्या नगरीत प्रथमच आदिवासी विद्यार्थी संघाने उमेदवार उभे होते, मतदारांनी कौल देत अविसच्या पाच सदस्याना निवडून दिले आहे. त्यामुळे आगामी होणाऱ्या पं.स.जि.प.निवडणूकांवार याचा परिणाम दिसणार आहे. मात्र नगरपंचायत मध्ये सत्ता बसवताना आदिवासी विद्यार्थी संघ किंगमेकर ठरणार हे मात्र निश्चितच आहे.
आज मत मोजणी झाल्यावर अहेरी नगरीत आविसचे विदर्भ सल्लागार जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या उपस्थितीत जलोष साजरा करण्यात आली. यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, जि.प.सदस्य अजय नैताम, जि.प.सदस्या कु.सुनीता कुसनाके, उपसभापती सौ.गीताताई चालुरकर, माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार, गुलाब सोयाम, उमेश मौहूर्ले, प्रशांत गोडसेलवार, कार्तिक तोगम, इरसाद शेख, मिलिंद अलोने, प्रकाश दुर्गे व कार्यकर्ते उपस्थित होते.