अहेरी प्रकल्प कार्यालयांतर्गत इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिली व दुसरी करीता प्रवेश प्रक्रिया

193

– 8 मार्च 2022 पर्यंत मुदत

The गडविश्व
गडचिरोली : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळामध्ये शिक्षण देणे या योजनेअंतर्गत शैक्षणिक सत्र 2022-23 करीता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली व 2 री मध्ये प्रवेश देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय अहेरी जि.गडचिरोली मार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इयत्ता 1 ली व 2 री मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा व इयत्ता 1 ली साठी जन्म दिनांक 01 ऑक्टोबर 2015 ते 31 डिसेंबर 2016 या कालावधीत जन्मलेला असावा. विद्यार्थ्यांचा पालक शासकीय/ निमशासकीय नोकर नसावा व त्यांचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लक्ष पेक्षा कमी असावे. या योजनेअंतर्गत विधवा/घटस्फोटित/निराधार व बी.पी.एल. यादीतील पाल्याचा प्राधान्याने विचार केला जाईल. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. अर्जासोबत विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे.
इयत्ता 1 ली व 2 री प्रवेशासाठीचे अर्ज प्रकल्प कार्यालय अहेरी जि.गडचिरोली येथे निशु:ल्क उपलब्ध होतील अथवा स्विकारले जातील. प्रवेशासाठीचे आवेदन पत्र आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 8 मार्च 2022 पर्यंत सादर करण्यात यावे असे सहायक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी जि.गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here