अहेरी येथे कव्वाली कार्यक्रमाचे माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन

205

– नवदुर्गा मंडळातर्फे कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन
The गडविश्व
अहेरी, ६ ऑक्टोबर : येथील श्री.नवदुर्गा मंडळाच्या वतीने २५ वर्षानंतर अहेरी नगरात कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उदघाटन माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार व अहेरी नगर पंचायतचे अध्यक्ष कु.रोजा करपेत, नागरपंचयातचे उपाध्यक्ष शैलेंद्र पटवर्धन, नगरपंचायत चे बालकल्याण सभापती सौ.मिनाताई ओंडरे, नगरसेविका सौ.सुरेखा विलास गोडसेलवार, नगरसेविका सौ.जोतीताई साडमेक, नगरसेविका कु.निखत रियाज शेख, नगरसेवक विलास सिडाम, नगरसेवक विलास गलबले, नगरसेवक महेश बाकेवार, नगरसेवक प्रशांत विलास गोडसेलवार, अजय साडमेक, कुमार गुरनुले तसेच संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here