The गडविश्व
मुंबई : आंतरराष्ट्रीय कोर्टात युक्रेनचा मोठा विजय झाला आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टात युक्रेनच्या बाजूने निकाल लागला असून कोर्टाने तातडीने युद्ध थांबविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच वाद वाढवू नका असे आयसीजे (ICJ) ने आपल्या आदेशात म्हटले. रशियाने बळाचा वापर केल्याने अत्यंत चिंतीत आहे असे आंतरराष्ट्रीय कोर्टाने म्हटले. या निकालावर आम्ही जिंकलो अशी प्रतिक्रिया झेलेन्स्की यांनी दिली आहे.
जर एखाद्या देशाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास नकार दिला, तर ICJ न्यायाधीश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे कारवाईची मागणी करू शकतात, जेथे रशियाला व्हेटो पॉवर आहे.
युक्रेनने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांना रशियाला तात्काळ लष्करी कारवाई थांबवण्याचे आदेश देण्याचे आवाहन केले. यापूर्वी ७ मार्च रोजी रशिया आणि युक्रेनमधील युद्धाबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी झाली होती. रशियाने सुनावणीवर बहिष्कार टाकला होता.