The गडविश्व
गडचिरोली, २९ सप्टेंबर : संपुर्ण जगात २८ सप्टेंबर हा दिवस “आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली येथे माहिती अधिकार दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पत्रकार गण मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष कांतीभाई सूचक यांनी माहिती अधिकार दिनाबाबत माहिती दिली. तसेच यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसुळ यांनीही माहिती अधिकार दिनाविषयी माहिती दिली व अधिनियम थोडक्यात सादर केला. प्रास्ताविक वामन खंडाईत यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन
संपादक अनुप मेश्राम यांनी केले. तर आभार महादेव बसेना यांनी केले.