आंबेशीवणी येथे शाळापूर्व तयारी अभियान मेळावा उत्साहात साजरा

274

The गडविश्व
गडचिरोली : तालुक्यातील जि.प. उ. प्राथमिक शाळा आंबेशिवनी येथे आज १६ एप्रिल रोजी शाळापूर्व तयारी अभियान साजरा करण्यात आला.
यामध्ये शैक्षणिक क्षेत्र २०२२- २०२३ मध्ये भरती पात्र विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांचा शारीरिक विकास ,बौद्धिक विकास ,भाषाविकास, गणनपूर्व तयारी इत्यादी स्तर तपासणी करून पूर्ण गोष्टींचे स्टॉल लावण्यात आले. तसेच स्टॉल वरती नावाची नोंदणी करण्यात आले.
नोंदणी केल्यानंतर त्यांचे वजन, उंची नोंदणी करून त्यांना ७ स्टॉलवर त्यांचे पूर्व नियोजित तयारी कशा पद्धतीत करायचे त्या संदर्भात त्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी एक कार्ड तयार काण्यात आले होते त्या कार्डनुसार त्यांच्या आई आणि वडील या दोन्हींच्या सोबत घेऊन समिती सोबत त्यांनी त्यांचे बौद्धिक विकास कितपत आहे आणि त्याच्यावर त्यांना पुढील वेळेस कोणत्या गोष्टींवर भर द्यावे यासाठी त्यामध्ये तपासणी शाळापूर्व तयारी करण्यात आली.
यावेळी गावच्या सरपंचा सौ.सरिता टेंभूर्णे, शाळा व्यस्थापन समिती अध्यक्ष हरिदास तुकाराम मस्के, रीना गौतम साहारे, ग्रामपंचायत सदस्या मुनघाटे, पो.पाटिल भैसारे, देवराव काळबांधे, विलास झांजाळ, राकेश झजाळ, विठ्ठल बोरुले, सूर्यवंशी, चौधरी तसेच गावातील युवा फ्रेंड्स क्लब आंबेशिवनी चे कोषाध्यक्ष सुरज बाबनवाडे ,युवा सदस्य सूरज पाल तसेच युवा मंडळाचे सर्व सदस्य, मॅजिक बस फाउंडेशनचे देवाजी बावणे, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेविका, पालक वर्ग, युवा , प्रतिष्ठित व्यक्ती आणि आंबेशिवनी टोली तसेच आंबेशिवनी येथील मुलांचे आई-वडील तसेच जिल्हा परिषद शाळा आंबेशिवनी तसेच टोली येथील शिक्षक वृंद , दोन्ही मराठी शाळेतील विद्यार्थी तसेच विद्यार्थीनी उपस्थित होते.
कार्यक्रमांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजक शाळेचे मुख्याध्यापक सुरेश बांबोळकर तसेच कार्यक्रमाचे संचालन सागर आत्राम आभार प्रदर्शन जाहेदा शेख यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here