– नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र
The गडविश्व
गडचिरोली, २८ जुलै : दरवर्षी २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षल्यांव्दारे शहीद सप्ताह पाळल्या जातो. याअंतर्गत नक्षल्यांव्दारे आजपासून नक्षल सप्ताह पाळल्या जाणार असल्याने पोलीस विभाग अलर्ट झाले जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या आदेशानुसार जिल्हयातील दुर्गम, अतिदुर्गम भागात नक्षल विरोधी अभियान अधिक तिव्र करण्यात आले आहे. मात्र या नक्षल सप्ताहाच्या पुर्वसंधला भामरागड तालुक्यातील पेरमिली-ताडगाव मार्गावर बॅनर आढळल्याने परिसरातील नक्षली सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.
शहीद सप्ताह कालावधीत नक्षल्यांव्दारे दुर्गम भागात हिंसात्मक घटना घडवून आणत यात शासकीय संपत्तीची जाळपोळ, मार्गावर झाडे तोडून वाहतूक विस्कळीत करणे आदी हिंसक कारवाया करण्याचा प्रयत्न केला जात असतो. आजपासून सप्ताहाला सुरूवात होत असल्याने नक्षल्यांच्या हिंसंक कारवायांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस सतर्क असून जिल्हयातील दुर्गम भागात नक्षल विरोधी अभियान अधिक तिव्र करण्यात आले आहे.
याच नक्षल सप्ताहाच्या पुर्वसंधेला नक्षल्यांव्दारे बुधवारी भामरागड तालुक्यातील पेरमिली- ताडगाव मार्गावर कुडकेली जवळ बॅनरबाजी करण्यात आली आहे. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर मागील पाच वर्षापासून नक्षल्यांच्या या सप्ताहाला जिल्हयातील ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांचे समर्थन मिळत नसल्याचे दिसून येत आहे.