आजादी का अमृत महोत्सव निमित्त रक्तदान विषय जनजागृती

193

The गडविश्व
गडचिरोली, ८ ऑगस्ट : जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशिय संस्था येनापुर द्वारा संचालित जिल्हा रक्तदाता शोधमोहिम व जनजागृती अभियानाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव निमित्त रक्तदान विषय जनजागृती करण्यात आली.
देशभरात आजादी का अमृत महोत्सव निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशिय संस्था येनापुर द्वारा संचालित जिल्हा रक्तदाता शोधमोहिम व जनजागृती अभियानाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव निमित्त काल ७ ऑगस्ट रोजी रक्तदान विषय जनजागृती करण्यात आली. यात चामोर्शी तालुक्यातील येनापुर, वायगाव, धर्मपुर, सोमनपल्ली, लक्ष्मणपूर, मुधोली रीठ, गणपुर या गावामध्ये जावून गृहभेटी द्वारे युवकांना भेटून रक्तदानाचे महत्व पटवून रक्तदानविषय जनजागृती करण्यात आली. तसेच जास्तीत जास्त युवकांनी आपल्या ग्रामीण भागात रक्तदान शिबिर आयोजित करून स्वयंपूर्तीने रक्तदान करावे अशी माहिती संस्थेचे सदस्य शेषराव कोहळे, जिल्हा रक्तदुत रवींद्र बंडावार, गणपुर रै चे ग्राम रक्तदूत जिवनदास भोयर यांनी जनजागृतीच्या माध्यमातून रक्तदान विषय माहिती देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here