गडविश्व
गडचिरोली, १२ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत असल्याच्या पार्श्वमूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपुर्ण देशभर साजरा होत आहे. जनसामान्यांमधे देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी रहावी यासाठी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहिम राबविण्यात येत आहे. गडचिरोली जिल्हयातील सर्व नागरिकांना जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस अधिक्षक अंकित गोयल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नागिरकांना आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी संजय मीणा
पोलीस अधिक्षक अंकित गोयल
जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद