– शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन तथा युवासेना गडचिरोली शहर यांचा संयुक्त उपक्रम
The गडविश्व
गडचिरोली : शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन तथा युवासेना गडचिरोली शहर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील चामोर्शी रोड वरील सेलिब्रेशन फंक्शन हॉल येथे आज २४ मार्च रोजी आरोग्याचा महायज्ञ चे आयोजन करण्यात आले आहे.
या आरोग्याच्या महायज्ञात मोफत आरोग्य तपासणी, औषधे चष्मे व हृदयरोग तपासणी करण्यात येणार आहे.
तरी या आरोग्याचा महायज्ञ चा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गडचिरोली शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, गडचिरोली युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर भांडेकर,गडचिरोली युवासेना जिल्हाप्रमुख दीपक भारसागडे तथा पदाधिकाऱ्यांनी केले आहे.