The गडविश्व
गडचिरोली, २४ सप्टेंबर : आजकाल समाजामध्ये असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढत आहे आणि स्ट्रोक (अर्धांगवायू/पॅरालिसिस) सारखे मेंदुविकार अकस्मात होणाऱ्या मृत्युसाठी कारणीभूत ठरत आहेत.गडचिरोली सारखा दुर्गम भाग सुद्धा या सदृश्य आजारांना अपवाद नाही. समाजाची ही गरज लक्षात घेता,सर्च हॉस्पिटल मध्ये ही मेंदुविकार ओपीडी प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी आयोजित करण्यात येत असून,डॉ ध्रुव बत्रा (Neurologist) या मेंदूविकार तज्ञांकडून ही सेवा पुरवण्यात येत आहे.
आज शनिवार २४ सप्टेंबर २०२२ रोजी ओपीडी होणार आहे असून या ओपीडी मध्ये स्ट्रोक (अर्धांगवायू/पॅरालिसिस) बरोबरच झटक्यांचा (मिरगी) आजार,विविध मज्जातंतू चे आजार,पार्किन्सन आजार, अल्जायमर आजार, जुनाट डोके दुखी, लहान मुलांचे मेंदूचे आजार, चक्कर येण्याचे अनेक आजार,मद्यपाणा मुळे होणारे मेंदुविकार अशा अनेक आजारांवर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळणार आहे. तसेच ही सुविधा जिल्ह्यातील जनतेसाठी अत्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या जात आहे. अशी सुविधा गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच उपलब्ध होत असून या सुविधेचा नागरिकांनी, विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी जनतेने मोठ्या प्रमाणात लाभ करून घ्यावा असे आवाहन सर्च तर्फे करण्यात आले आहे.