‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘स्वराज्य महोत्सव’ निमित्त न.प. गडचिरोली तर्फे प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत लाभार्थी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

384

The गडविश्व
गडचिरोली, १३ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्धल गडचिरोली नगर परिषदेच्या वतीने “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२२ पर्यंत स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्याने स्थानिक गडचिरोली नगर परिषदे तर्फे गडचिरोली नगर परिषदेतील सभागृहा गुरुवार ११ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १२.०० वाजता प्रधानमंत्री आवास योजना- शहरी अंतर्गत लाभार्थी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.सदर मेळाव्यात गडचिरोली शहरातील नागरिकांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला. सदर मेळाव्यात लाभार्थ्यांना घरकुल योजनेबाबत तसेच आवश्यक कागदपत्राबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगर परिषदेच्या प्रधानमंत्री आवास योजना- शहरी अंतर्गत शहरस्तरीय तांत्रिक कक्षातील स्थापत्य अभियंता निकेश गहाने व एम आय एस तज्ञ ब्रम्हानंद काळे यांनी परिश्रम घेतले तसेच लाभार्थ्यांना घरकुल योजनेबाबत तसेच आवश्यक कागदपत्राबाबत मार्गदर्शन केले.
मेळाव्यानंतर उपस्थित लाभार्थ्यानी त्यांना असलेल्या शंकेचे समाधान झाल्याचे मत व्यक्त केले. सदर मार्गदर्शन मेळावा मुख्याधिकारी विशाल वाघ व रचना सहायक गिरीश मैंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here