The गडविश्व
गडचिरोली, १३ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्धल गडचिरोली नगर परिषदेच्या वतीने “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२२ पर्यंत स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्याने स्थानिक गडचिरोली नगर परिषदे तर्फे गडचिरोली नगर परिषदेतील शाळेत १० ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता नगर परिषदेच्या शाळेमध्ये रांगोळी व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्पुर्तपने भाग घेतला. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी नगर परिषदेच्या एकूण १० शाळेतील मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षकांसोबत शिक्षण विभागप्रमुख रवींद्र भंडारवार, केंद्रप्रमुख सुधीर गोहणे तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. तसेच नगर परिषदेच्या कर्मचारी श्रीमती. फुलवंती धनगून व सौ. सोनाली भोयर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता परिश्रम घेतले.