आणखी ३५ यूट्यूब चॅनेलवर केंद्र सरकारची कारवाई : ट्विटर, इन्स्टाग्राम, वेबसाईट आणि फेसबुक अकाऊंटही केले ब्लॉक

265

The गडविश्व
नवी दिल्ली : मोदी सरकारने आणखी 35 यूट्यूब चॅनेल ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. सूचना प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त संचिव (P&A) विक्रम सहाय म्हणाले की, 20 जानेवारीला गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर 35 यूट्यूब चॅनेल, दोन ट्विटर अकाऊंट, इन्स्टाग्राम, वेबसाईट आणि फेसबुक अकाऊंट ब्लॉक केले आहे.
या अगोदर 19 जानेवारीला माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले होते की, भारताविरोधी प्रचार करणाऱ्या आणि खोट्या बातम्या (Fake News) चालवल्याप्रकरणी ही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मला सांगताना आनंद होतो की जगातील अनेक देशांनी याचे अनुकरण केले आहे. युट्यूब देखील पुढे आले असून त्यांनी ब्लॉक केले आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने डिसेंबर महिन्यात गुप्तचर यंत्रणेसह 20 यूट्यूब (YouTube) चॅनेल आणि 2 वेबसाइट ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. कारण यातील बहुतेक मजकूर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संवेदनशील होता. वस्तुस्थितीनुसार तो चुकीचा होता. त्यामुळे सरकारने आपत्कालीन अधिकारांचा वापर करून चॅनेल आणि वेबसाइट्सना ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते.
या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनाबद्दल देखील चुकीच्या बातम्या देण्यात आल्या होत्या. तसेच , नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याशी संबंधित निदर्शने आणि भारत सरकारच्या विरोधात अल्पसंख्याकांना भडकवण्याचा प्रयत्न करण्यासंदर्भात खोट्या बातम्या देण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय सुरक्षेचा दृष्टीने ही कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे केंद्राने म्हटले आहे. आगामी 5 राज्यांतील निवडणुकांमध्ये लोकशाही प्रक्रियेला या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून खीळ घालण्याची भीती देखील भारत सरकारने व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here