The गडविश्व
गडचिरोली, २५ जुलै : महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) शासन निर्णय १९ जानेवारी, २०१८ अन्वये राज्यातील ग्रामिण व शहरी भागात नागरिकांपर्यंत शासकीय, निमशासकिय व खाजगी सेवा पोहचविण्याकरीता प्रत्येक ग्राम पंचायतस्तरावर व नगर परिषद, नगर पंचायतस्तरावर आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करावयाचे असल्यामुळे, गडचिरोली जिल्हयातील रिक्त असलेल्या ३४३ ग्राम पंचायतस्तरावर व ०३ नगर पंचायतस्तरावर आपले सरकार सेवा केंद्र रिक्त असल्याने महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) शासन निर्णय दिनांक १९ जानेवारी, २०१८ च्या परिच्छेद १ (अ) व (आ) मधिल निकषानुसार ग्राम पंचायतस्तरावर ३५१ व नगर पंचायतस्तरावर ०३ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करावयाचे आहे.
करीता आपले सरकार सेवा केंद्र अर्ज स्विकारण्याची २५ जुलै २०२२ पर्यंत देण्यात आली होती परंतु जिल्हयात निर्माण झालेल्या पुर परिस्थितीमुळे अपेक्षित अर्ज संख्या प्राप्त न झाल्याने अर्ज सादर करण्यास ०५ ऑगस्ट २०२२ पर्यंत मुदत वाढवून देण्यात येत आहे. तरी इच्छुक उमेदवारांकडून ०५ ऑगस्ट २०२२ चे कार्यालयीन वेळेपर्यंत अर्ज स्विकृत करण्यात येतील. गडचिरोली जिल्हयात रिक्त असलेल्या ३४३ ग्राम पंचायत व ०३ नगर पंचायतची यादी व अर्जाचा नमुना, जिल्हयाच्या वेबसाईट www.gadchiroli.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.