– २७ रक्तदात्यांनी केले रक्तदान, महिला व युवतींचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली : स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समितीच्यावतीने देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथे आज रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराला महिला व युवीतींनी पुढाकार घेत एकुण २७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
स्वयं रक्तदार जिल्हा समिती ही विविध जिल्हयांमध्ये रक्तपुरवठा करण्यास अग्रेसर आहे. गरजु व्यक्तींना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याचा या समितीचा मानस आहे. समितीच्या माध्यमातून अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजुंना मदत केली आहे. तसेच रक्तदान समितीचे अध्यक्ष चारूदत्त राऊत यांच्या मार्गदर्शनात या समितीची जाळे विविध जिल्हयामध्ये पसरले आहे. या माध्यमातून अनेक युवक-युवती रक्तदान करण्यास पुढे येत आहेत.
आज आमगाव येथील रक्तदान शिबीरात एकुण २७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये महिला व युवतींनीही पुढाकार घेतला. यावेळी भावना निकम, मुनेश बल्लमवार, गोपाल उईनवार, राजकुमार कांबळे, किशोर कांबळे, दिनेश वालदे, सचिन ठाकरे, फिरोज उपलचिवार, अजय बल्लमवार, शेखर ठाकरे, अविनाश उईनवार, अमोल ठाकरे, श्रीधर ठाकरे, स्वप्नील देशमुख, पवन निकम, दुपारे, नेताजी प्रधान, राजेश्वर कोल्हे, सुधीर प्रधान, योगेश ठाकरे, वैभव दुबे, मृणाल काळबांधे, रामेश्वर नवघडे, सागर गडपायले, करण उईके, विनय कोल्हे, ऋतिक कांबळे इत्यादी 27 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कर्तव्य पार पाडली.
त्यामध्ये प्रामुख्याने पुढाकार चांदनी सेलोटे, कल्याणी ढोरे, जानव्ही गुरफुले, आरती झरकर, विजय कोल्हे, सुधीर प्रधान, वैभव कुथे, प्रशिक कोसेकर इत्यादींनी सहकार्य करून रक्तदान शिबिर उत्तम प्रकारे पार पडला.
यावेळी स्वयं रक्तदाता जिल्हा समितीचे अध्यक्ष चारुदत्त राऊत आणि समितीचे इतर सदस्य व रक्तदाते, आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.