आमदार नितेश राणे यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

245

The गडविश्व
मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांना संतोष परब हल्ला प्रकरणी कणकवली दिवाणी न्यायालायने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सरकारी वकीलांनी नितेश राणे यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. पोलिसांनी याप्रकरणी तपास अहवाल कोर्टात सादर केला. नितेश राणे यांचा थेट सहभाग गुन्ह्यात आहे, असे म्हणणे पोलिसांनी मांडले आहे. ज्या पीएच्या फोनवरुन फोन केले होते, त्या पीएलादेखील अटक केली असून दोघांना समोरा-समोर बसवून चौकशी करायची आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.
यानंतर न्यायालयाने आमदार नितेश राणे यांना दोन दिवसांची म्हणजे ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, कणकवली दिवाणी न्यायालयाबाहेर नितेश राणे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणाव जमले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here