The गडविश्व
गडचिरोली, २३ ऑगस्ट : आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निर्देशानुसार २०२४ चे लोकसभा मिशन लक्षात घेता १४ ऑगस्ट २०२२ ला नागपूरला आप पदाधिकारी अधिवेशनात सर्वानुमते राज्य व विदर्भ समितीमध्ये जोमाने कार्य करावे असे निर्णय घेण्यात आले व २१ ऑगस्ट २०२२ ला जिल्हा कार्यकर्ता बैठक शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे घेण्यात आली व जिल्हा ते तालुका, ग्रामीण भागात जाऊन कार्यकर्ते म्यापिंग कार्य करण्याचे सर्व पदाधिकारी यांना विदर्भ समितीचे सदस्य मनोहर पवार यांनी सर्व स्थानिक स्वराज्य निवडणूका समोर ठेवून जोमाने कार्य करावे असे मार्गदर्शन केले. त्यावेळी जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांचे नेतृत्वाखाली सर्व (१२) बाराही तालुक्यातील गावाचे म्यापिंग कार्य करण्याचे मनोगत व्यक्त करण्यात आले व आप जिल्हा सदस्य यांचेवर प्रत्येक तालुक्याची जबाबदारी वेळापत्रक नुसार सोपविण्यात आले.
त्यावेळी प्रकाश जीवनी, तेजस मेकार्तिवार, आचल खोब्रागडे यांचा पक्ष प्रवेश घेण्यात आला. संचालन जिल्हा सचिव भास्कर इंगळे, शहर संयोजक कैलास शर्मा, डॉ देवेंद्र मुंघाटे, संजय जीवतोडे, डॉ सुरेश गेडाम, प्रभाकर वाकडे, सुरेश चिंचोळकर, विलास मुनगंटीवार, चेतन येनगटिवार, विलास धुळेवार, निलेश नैताम, सुखसागर झाडे, संतोष कोटकर, जितेश खोब्रागडे, प्रमोद वाटे, सीलास खांडेकर, रुपेश सावसाकडे, सोनल ननावरे, मीनाक्षी खरवडे, अल्का गजबे, समिता गेडाम, प्रसाद खरवडे, दीपिका गोवर्धन, नामदेव पोले, मारोती मुंघाटे, दिलीप टेकरे, शशिकांत वासेकर, अचित ठाकूर, विजय बालमवार, भाऊराव मानपलीवर, गणेश त्रिमुखे, भास्कर आत्राम, नावेद शेख, मनोज गडसुलवार, तबरेज पठाण, साहिल बोदेले, देविदास उराडे, अनिल बाळेकरमकर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आभार हितेंद्र गेडाम यांनी केले.
