The गडविश्व
गडचिरोली : महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने शहराच्या मुख्य इंदिरा चौक येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली व शरबत वितरण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली सत्ता स्थापन करण्यासाठी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल अंत्यत प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. सध्या व्यवस्था परिवर्तनाची खरी गरज आहे. डॉ.बाबासाहेबांच्या अनुयायांनी आम आदमी पार्टीचे हात बळकट करण्यासाठी व्यवस्था परिवर्तनाचे लढ्यात सामील व्हावे व बाबासाहेबांचे स्वप्न साकार करावे असे जयंती दिनी आवाहन आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आले.
“बाबा तेरा सपना अधुरा,आम आदमी करेगी पूरा” कार्यक्रमाला जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी महामंत्री भास्कर इंगळे, कोषाध्यक्ष संजय जिवतोडे, संघटन मंत्री डॉ.देवेंद्र मूनघाटे, शहर संयोजक रुपेश सावसाकडे, हितेंद्र गेडाम, एकनाथ गजबे, अनिल बाळेकरमकर, नामदेव पोले, कैलास शर्मा, रमेश उपल्लवार, प्रकाश सोनूले, रुपेश टेकाम , सूरेश कोवे, भैयाजी महाजन, विनोद धकाते, संजय पून्नावार, शैलेश पिसे, किशोर देशमुख, संजय बाटबरवे, कबिर चव्हाण, हरीष वैरागडे, महेश बिके, ऐ.के.पठान, आचीत ठाकूर, गणेश त्रिमुखे, सोनल न्ननावरे, अलका गजबे, समीता गेडाम, गौतम गेडाम इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.