– ग्राम पंचायत व गुरुदेव जंगल कामगार सोसायटी यांच्या पुढाकाराने विविध कार्यक्रमांचे आयोजन
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी,(नरेश ढोरे) १५ नोव्हेंबर : ग्राम पंचायत जोगीसाखरा व गुरुदेव जंगल कामगार सोसायटी यांच्या सौजन्याने आज १५ नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे असे आवाहन सरपंच संदीप ठाकुर आणि जकासचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांनी केले.
तसेच आदिवासी ( गोंड) समाजाच्या वतीने आदीवासी जनजागरण मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात दुपारी तीन वाजता रैला नृत्यची रैली संपुर्ण गावभर काढुन सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहे. या जयंती उत्सवात आदिवासी ( गोंड) समाज व गावातील इतर समाजातील सर्व जनता सहभागी होऊन कार्यक्रम पार पाडण्यासाठी मदत करतात.