आरमोरी : आज पुन्हा नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा बळी

2305

– नरभक्षक वाघाचे मानवावरील हल्ले थांबता थांबेना
The गडविश्व
ता.प्र / नरेश ढोरे (आरमोरी ) : तालुक्यातील नरभक्षक वाघाचे मानवावरील हल्ले थांबता थांबेना. आज ११ ऑक्टोबर रोजी पुन्हा नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा बळी गेल्याची घटना सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. पुरुषोत्तम सावसाकडे (३५) रा. रवी ता.आरमोरी असे मृतकाचे नाव आहे Puroshattam Sawsakade.
तालुक्यातील रवी येथील शेतकरी पुरुषोत्तम सावसागडे हे आज सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास शेतात गेले असता नरभक्षक वाघाने त्यांच्यावर झडप घेऊन ठार केले. सदर घटनेची माहिती मिळताच गावातील काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व वनविभागाला कळविले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मोका चौकशी केली व मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे पाठविण्यात आले.
वाघाचे हल्ले थांबता थांबेना. तालुक्यातील हा वाघाच्या हल्ल्यातील नववा बळी असून अशा घटना वारंवार घडत असल्याने वाघाला पकडण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी जणआक्रोश उफाळून आला आहे. नागिरकांनी वांरवांर मागणी करूनही वाघाला पकडण्यात येत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे आता वनविभागाच्या विरोधात नागरिक कोणता पवित्रा घेतात त्याचा विचार करण्याची गरज आहे.

(Tiger attack gadchiroli news gadchiroli armori ravi Forest gadchrioli armori )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here