– महात्मा योतिराव फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून 129 नागरिकांनी घेलला लाभ
The गडविश्व
गडचिरोली : उपजिल्हा रूग्णालय आरमोरी एकत्रीत महात्मा ज्योतीराव फुल जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत समाविष्ट आहे. या योजनांमुळे गरिबांना नविन आशेच किरण दिसत आहे. आतापर्यंत या रूग्णालयातून या योजनेचा 218 नागरिकांनी मोफत लाभ घेताला आहे.
या योजनेअंतर्गत 34 प्रकारच्या स्पेशालिटी असून एकुण आजार 996/1209 इतक्या उपचार व शस्त्रक्रिया सेवा विनामुल्य घेता येतात. या योजनेत कॅन्सर, हृदयरोग, किडणीचे आजार, लहान मुलांचे गंभीर आजार, स्त्रियांच्या गंभीर आजारांचा समावेश करण्यात आला आहे. नवजात शिशचे काविळ, एॅनिमिया, सिकलसेल, हरणिया, हायड्रोसिल असे विविध आजार असलेल्या रूग्णांनी या योजनेच्या माध्यमातून लाभ घेतलेला आहे. उपजिल्हा रूग्णालय आरमोरी येथे आतापर्यंत 127 रूग्णांनी या योजनेतून उपचाार घेतला असून रूग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक डॉ.छाया उईके हे रूग्णांना मार्गदर्शन करीत समाधानकारक उपचार करून देत आहेत. या योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा प्रमुख लिलाधर धाकडे, जिल्हा समन्वयक डॉ. प्रिती गोलदार डिएमओ, कृतीका कवठे, जिल्हा पर्यवेक्षक लक्ष्मीकांत वानिक यांच्याशी संपर्क साधावा.
या योजनेचे लाभ घेण्यासाठी पिवळे, केशरी, अन्नपुर्ण, अंत्योदय शिधापत्रीका तसेच मर्यादित कालावधीकरीता पांढरे राशन कार्डधारक कुटुंब योजनेचे पात्र लाभार्थी आहेत. व रूग्णांचे सामान्य ओळखपत्र, मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायविंग लायसन्स, शाळेचे ओळखपत्र, यापैकी कोणतेही एक असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अंगीकृत रूग्णालयात आरोग्यमित्र यांच्याशी संपर्क साधावा.
योजना यशस्वी करण्याकरिता वैद्यकीय अधिक्षक डॉ.छाया उईके, वैद्यकीय अधिकारी डॉ.बन्सोड, डॉ. धात्रक, डॉ. मारबते, डॉ. देशमुख, डॉ. रायपुरे, डॉ. भावे, अधिसेविका श्रीमती पारधी, श्रीमती आठवले, श्रीमती निकेसर, श्रीमती तुपटे, एक्सरे तंत्रज्ञ श्रीमती धारणे, सर्व प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य मित्र विनोद मोहनकर व सर्व रूग्णालयातील कर्मचारी यांनी सहकार्य केले.